उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

बेंबळी   : सागंवी ता. उस्मानाबाद येथील- महेश प्रभाकर पाटील यांची अंदाजे  एकुण 36,500 ₹ किंमतीची बजाज सी टी मोटारसायकल क्र.एम.एच.25 एटी 7205 व सॅमोबाईल फोन हे दि.05.01.2023 रोजी 20.00 ते 24.00 वा.सु. सागंवी परिसरात माडी सागंवी ते दाउतपुर जाणारे रोडवर अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या महेश पाटील यांनी दि.10.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : जळकोट, ता. तुळजापूर येथील- अशोक अंबादास गंगणे यांच्या शेत गट क्र. 866 मधील अंदाजे 64,000 ₹ किंमतीचे 32 कि.ग्रॅ. वजनाचे 70 व 22 कि.ग्रॅ. वजनाचे 22 अशा एकुण 65 लोखंडी नळ्या दि. 08.01.2023 रोजी 04.30 ते ‍05.00 वा. दरम्यान त्यांच्या शेतातील सालगड्याने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या अशोक गंगणे यांनी दि. 10.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 381 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील- आनंद भडंगे यांची आई दि. 08.01.2023 रोजी 14.00 वा. सु. उस्मानाबाद बस स्थानकातील बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने आनंद यांच्या आईच्या गळ्यातील सुमारे 25 ग्रॅम वजनाचे सुवर्ण मंगळसुत्र त्यांच्या नकळत चोरुन नेले. अशा मजकुराच्या आनंद भडंगे यांनी दि. 10.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web