उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

ढोकी  : जिवाचीवाडी, ता. केज, जि. बीड येथील- हिरामन भिवा साळुंके, व्यवसाय- ऊसतोड मजूर हे तुगाव शिवारात त्यांच्या साथीदारांसह ऊसतोड कामास आहेत. दि. 28- 29.12.2022 रोजी दरम्यानच्या रात्री त्यांच्या पालाचा दरवाचा अज्ञात व्यक्तीने उघडून आतील अंदाजे 8,000 ₹ किंमतीचे दोन मोबाईल फोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या हिरामन साळुंके यांनी दि.30.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : काक्रंबा, ता. तुळजापूर येथील- रामचंद्र चांगदेव ठोंबरे यांच्या काक्रंबा गट क्र. 30 मधील शेत विहिरीवरील अंदाजे 9,000 ₹ किंमतीचा फलेक्सन कंपनीचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा पाणबुडी विद्युत पंप दि. 29- 30.12.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या रामचंद्र ठोंबरे यांनी दि.30.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : जळकोट, ता. तुळजापूर येथील- भिमाशंकर शिवाजी कदम यांच्या जळकोट गट क्र. 792 मधील शेतातील अंदाजे 20,000 ₹ किंमतीचा 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप दि. 29- 30.12.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या भिमाशंकर कदम यांनी दि.30.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web