उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

उस्मानाबाद : ज्योतीनगर, उस्मानाबाद येथील- दिलीप हरिचंद्र जगाले यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एई 1704 ही दि. 19- 20.11.2022 रोजी दरम्यानच्या रात्री त्यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या दिलीप जगाले यांनी दि. 08.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी  : कोंड, ता. उस्मानाबाद येथील- तुकाराम श्यामराव भोसले यांच्या सुंभा गट क्र. 125 मधील शेतात हरभरा पिकास पाणी देण्यासाठी लावलेला अंदाजे 28,000 ₹ किंमतीचा तुषारसिंचन संच दि. 07.12.2022 रोजी 18.00 ते 19.30 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या तुकाराम भोसले यांनी दि. 08.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : वडगाव, ता. कळंब येथील- बब्रुवान गणपती बनसोडे यांच्या वडगाव शिवारातील शेतातील अंदाजे 1,50,000 ₹ किंमतीच्या मुर्रा जातीच्या दोन म्हैशी दि. 06- 07.12.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या बब्रुवान बनसोडे यांनी दि. 08.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web