उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल
मुरुम : दाळींब, ता. उमरगा येथील- अंबादास गुंडाप्पा फडताळे यांचा अंदाजे 2,00,000 ₹ किंमतीचा अशोक लेलँड वाहन क्र. एम.एच. 25 एजे 0624 हा दि. 02- 03.12.2022 रोजी दरम्यानच्या रात्री दाळींब येथील ज्योती ॲग्रो ॲन्ड मशिनरी या दुकानासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या अंबादास फडताळे यांनी दि. 06.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : फक्राबाद, ता. वाशी येथील- दत्तात्रय विश्वनाथ मुरकुटे यांची अंदाजे 25,000 ₹ किंमतीची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएन 3153 ही दि. 04.12.2022 रोजी 15.30 वा. सु. वाशी येथील आठवडी बाजार परिसरातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या दत्तात्रय मुरकुटे यांनी दि. 06.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : शिंगोली, ता. कळंब येथील- रंजना भागवत माने यांच्या शिंगोली शिवारातील शेत विहीरीतील अंदाजे 14,000 ₹ किंमतीचा सिआरआय कंपनीचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप दि. 04- 05.12.2022 रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या रंजना माने यांनी दि. 06.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.