उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

उस्मानाबाद  : बार्शी येथील- महेबुब मिया शेख, वय 37 वर्षे हे दि. 03.12.2022 रोजी 21.00 वा. सु. उस्मानाबा शहर शिवारातील वैराग रोडलगत नबीलाल यांच्या शेतात पोकलेन यंत्राने काम करत होते. यावेळी बार्शी येथील- शिवम भराडीया यांसह दोन अनोळखी व्यक्तींनी संगणमताने वाहन क्र. एम.एच. 13-4001 मधून महेबुब शेख काम करत असलेल्या नमूद शेतात जाउन पोकलेन चे हप्ते भरण्याच्या कारणावरुन महेबुब यांच्याशी वाद करुन त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच महेबुब यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम सुवर्ण चैन, सॅमसंग मोबाईल फोन व 1,20,000 ₹ रोख रक्कम जबरीने काढून घेउन तेथून पसार झाले. अशा मजकुराच्या महेबुब शेख यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दि. 05.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394, 326, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम : मुदकण्णा गल्ली, मुरुम येथील- मल्लीनाथ मारुती कारडामे यांच्या मुरुम गट क्र. 258 मधील शेतातील अंदाजे 25,000 ₹ किंमतीची एक लोखंडी बैलगाडी दि. 08.05.2022 रोजी 21.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या मल्लीनाथ कारडामे यांनी दि. 05.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : डोंजा, ता. परंडा येथील- रणजित बापुराव सुर्यवंशी हे दि. 04.12.2022 रोजी 14.20 वा. सु. परंडा येथील आठवडी बाजारात गेले असता गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने रणजित यांच्या सदऱ्याच्या खिशातील अंदाजे 13,000 ₹ किंमतीचा रिअलमी मोबाईल फोन त्यांच्या नकळत चोरला. अशा मजकुराच्या रणजित सुर्यवंशी यांनी दि. 05.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web