उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

तुळजापूर  : बारुळ, ता. तुळजापूर येथील- संभाजी सुभाष पाटील यांच्या शेतातील शेडचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 20.11.2022 रोजी 21.00 वा. ते दि. 21.11.2022 रोजी 10.30 वा. दरम्यान तोडून आतील अंदाजे 1,45,824 ₹ किंमतीचे 40 पोती सोयाबीन चोरुन नेले. अशा मजकुराच्या संभाजी पाटील यांनी दि. 21.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : अचलेर, ता. लोहारा येथील- राहुल चंद्रकांत वाघमारे यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 20.11.2022 रोजी 22.00 ते दि. 21.11.2022 रोजी 05.00 वा. दरम्यान तोडून घरात प्रवेश करुन कपाटात असलेले सुवर्ण दागिने व 1,40,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 1,47,500 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या राहुल वाघमारे यांनी दि. 21.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : तुळजापूर येथील- लक्ष्मण काशीनाथ वाघमोडे यांची अंदाजे 12,000 ₹ किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एस 9277 ही दि. 14.11.2022 रोजी 19.00 ते 19.15 वा. सु. दरम्यान तुळजापूर शहरातील भारत टायर वर्क या दुकानाजवळून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या लक्ष्मण वाघमोडे यांनी दि. 21.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web