उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

नळदुर्ग  : घरकुल, नळदुर्ग येथील- शांताबाई किरण माने, वय 49 वर्षे या दि. 19.11.2022 रोजी 12.30 ते 13.00 वा. दरम्यान घराचा दरवाजा पुढे सरकावून बाहेर गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात दरवाजास कुलूप नसल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करुन आतील 1 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, 60 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व 9,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 44,000 ₹ माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या शांताबाई माने यांनी दि. 19.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : पिंपळा (बु.), ता. तुळजापूर येथील- विजयकुमार प्रभाकरे जाधव, वय 40 वर्षे यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची हिरो पॅशन प्रो. मोटारसायकल क्र. एम.एच. 25 वाय 2916 ही दि. 18.11.2022 रोजी 23.30 वा. ते 19.11.2022 रोजी 06.00 वा. दरम्यान गावकरी- नरवडे यांच्या पिंपळा (बु.) शिवारातील शेताजवळील देवकुरळी रस्त्याकडेवरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या विजयकुमार जाधव यांनी दि. 19.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : हणुमंतनगर, उस्मानाबाद येथील- आरोण जिवनकुमार आनंदराव सर्वेपल्ली यांची अंदाजे 20,000 ₹ किंमतीची बजाज सीटी मोटारसायकल क्र. ए.पी. 29 ई 7866 ही दि. 15.11.2022 रोजी 20.30 ते दि. 16.11.2022 रोजी 08.00 वा. दरम्यान हणुमंतनगर येथून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या आरोण सर्वेपल्ली यांनी दि. 19.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web