उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल
कळंब : सातारा येथील- स्नेहा रमेश चोडे, वय 32 वर्षे या दि. 27.10.2022 रोजी 13.10 वा. सु. कळंब बस स्थानकातील बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने स्नेहा यांच्या पर्सची चैन उघडून त्यातील 25,000 ₹ रोख रक्कम त्यांच्या नकळत चोरुन नेली. अशा मजकुराच्या स्नेहा चोडे यांनी दि. 27.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : वाघोली, ता. उस्मानाबाद येथील- मोहण हरिश्चंद्र मगर यांसह त्यांचे मित्र- महेश निर्मळे व बालाजी कुंभार असे तीघे दि. 27.10.2022 रोजी 02.00 ते 06.00 वा. दरम्यान मगर यांच्या घरासमोरील अंगणात झोपलेले होते. दरम्यानच्या काळात मोहण मगर व महेश निर्मळे या दोघांच्या उषाचे अनुक्रमे वन प्लस कंपनीचा व सॅमसंग कंपनीचा असे दोन मोबाईल फोन तसेच गावकरी- गणेश हुकीरे हे पण त्यांच्या दुकानासमोर झोपलेले असताना त्यांचाही रियलमी कंपनीचा मोबाईल फोन असे एकुण अंदाजे 43,000 ₹ किंमतीचे तीन मोबाईल फोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या मोहण मगर यांनी दि. 27.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा : तावशीगड, ता. लोहारा येथील- अशोक मारुती जाधव यांच्या तावशीगड गट क्र. 124 मधील पत्रा शेडचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 22.10.2022 रोजी 19.00 ते दि. 23.10.2022 रोजी 06.00 वा. दरम्यान तोडून आतील 6 शेळ्या व 15 कोंबड्या एकुण अंदाजे 25,000 ₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या अशोक जाधव यांनी दि. 27.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.