उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 

तुळजापूर  : सांगवी (मार्डी), ता. तुळजापूर येथील- दुशंत हरीदास बागल, वय 33 वर्षे यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एसी 0112 ही दि. 29.09.2022 रोजी 23.00 वा. ते दि. 30.09.2022 रोजी 04.00 वा. दरम्यान त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या दुशंत बागल यांनी दि. 05.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : देवगाव, ता. परंडा येथील- श्रीराम रमेश पाटील यांच्या सोनगिरी गट क्र. 11 (अ) मधील शेतातील कडबाकुटीचा 3 अश्वशक्ती क्षमतेचा लक्ष्मी विद्युत पंप अज्ञात व्यक्तीने दि. 29.09.2022 ते दि. 02.10.2022 रोजी 14.00 वा. पुर्वी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. तसेच गावकरी- मोहन शेलार, वैभव पाटील, चांद शेख, बालाजी दौंड यांच्याही शेतातील विद्युत पंप व अनिता कोळी यांच्या शेतातील दोन शेळ्या चोरुन नेल्या आहेत. अशा मजकुराच्या श्रीराम पाटील यांनी आज दि. 06.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : अश्रुबा मनोहर कसपटे, वय 42 वर्षे, रा. कळंब हे दि. 05.10.2022 रोजी 16.00 वा. सु. कळंब येथील त्यांच्या ‘सम्राट बार ॲण्ड रेस्टॉरंट’ मध्ये होते. यावेळी कन्हेरवाडी, ता. कळंब येथील- 1)नाना भास्कर काळे 2)हरी भास्कर काळे 3)कालीदास भास्कर काळे 4)राहुल नाना काळे 5)अमोल नाना काळे 6)राजु कालिदास काळे 7)अश्विनी सुभाष काळे या सर्वांनी अश्रुबा कसपटे यांना तलवारीचा धाक दाखवून बारमधील विदेशी दारुच्या 8 सिलबंद बाटल्या व गल्ल्यातील 3,600 ₹ रोख रक्कम लुटून नेला. यावेळी अश्रुबा यांनी त्यांना प्रतिकार केला असता नमूद लोकांनी अश्रुबा यांना लाथाबुक्क्यांनी तर नाना काळे याने उलट्या तलवारीने अश्रुबा यांच्या डोक्यात वार करुन त्यांना जखमी केले. दरम्यान घटनास्थळी कळंब पो.ठा. चे सपोनि- श्री. कल्याण नेहरकर व पोहेकॉ- व्हंडे यांचे पथक येउ लागल्याची चाहुल लागताच नमूद लोक त्यांनी आनलेल्या एका चारचाकी वाहनातून पसार झाले. यावर पोलीस पथकाने अश्रुबा यांना सोबत घेउन लुटारुंचा पाठलाग करुन अंदोरा शिवारात त्यांच्या वाहनास गाठण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नमूद तीघांवर दगडफेक करुन त्यांना जखमी केले. यावरुन अश्रुबा कसपटे यांनी दि. 05.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 395, 323, 504 सह शस्त्र कायदा कलम- 4, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web