उस्मानाबाद जिल्ह्यात फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

उमरगा  : न्यु बालाजीनगर, उमरगा येथील- बलभिम बसवणप्पा पाटील, वय 63 वर्षे हे दि. 26.12.2022 रोजी 14.15 वा. सु. उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे पायी जात होते. दरम्यान एका अनोळखी पुरुषाने पाटील यांना पोलीस बोलवत असल्याचे सांगून जवळच एका मोटारसायकलसह उभ्या असलेल्या पुरुषाकडे घेउन गेला. यावेळी त्या पोलीस असल्याची बतावनी केलेल्या पुरुषाने, “ तुम्ही दोघे चोर व साथीदार असून तुमच्या जवळील दागिने तपासण्यास द्या.” असे पाटील व त्यांना बोलावून नेलेल्या पुरुषास सांगीतले. यावर पाटील यांना बोलावलेल्या पुरुषाने त्यांच्या जवळील दागिने, फोन आपल्या रुमालात बांधून त्या तोतया पोलीसाच्या ताब्यात दिले असता त्यांने ते तपासून परत त्या पुरुषास दिले. यावर पाटील यांनीही आपला स्मार्टफोन व अंगावरील 22 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने काढून रुमालात बांधून त्या तोतया पोलीसाकडे दिले. यावर त्याने ते तपासून पाटील यांना परत केले असता पाटील यांस बोलावलेला अनोळखी पुरुष व तो तोतया पोलीस एका मोटारसायकलने तेथून निघून गेले. यानंतर पाटील यांनी तो बाधलेला रुमाल सोडला असता त्यात फक्त त्यांचा स्मार्टफोन असून सुवर्ण दागिने त्या दोन भामट्यांनी हातचलाखीने लाबवल्याचे त्यांना समजले. अशा मजकुराच्या बलभिम पाटील यांनी दि. 26.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 170, 419, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 परंडा  : पाचपिंपळा ता. भुम येथील- दिलीप श्रीमंत माळी हे पाचपिंपळा, ता. परंडा येथील- नवनाथ जगन्नाथ खैरे यांच्या पाचपिंपळा गावातील खंडेश्वरी मोटर्स या दुकानात व्यवस्थापक म्हणुन कामास होते. दिलीप माळी यांनी सन- 2019 पासून ते एप्रील 2022 दरम्यान नमूद दुकानात आलेल्या ग्राहकांचे मोटार दुरुस्तीचे पैसे वेळोवेळी ऑनलाईन पध्दतीने आपल्या खात्यावर घेउन एकुण सुमारे 18,18,000 ₹ रक्कम मालक- खैरे यांना न देता त्यांची फसवणूक करुन त्या रक्कमेचा माळी यांनी स्वत:च्या फायद्याकरीता अपहार केला. अशा मजकुराच्या नवनाथ खैरे यांनी दि.26.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 406, 408, 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  रुई, ता. वाशी येथील- परमेश्वर तुळशीराम गायकवाड यांनी ऊसतोड मजूर पुरवण्याचा करार दि. 10.08.2022 रोजी 16.00 वा. सु. वाशी येथे सरमकुंडी येथील- दशरथ विश्वनाथ गायकवाड यांच्याशी करुन त्यापोटी दशरथ यांच्याकडून रोख स्वरुपात व बँक खात्यावर अशा दोन व्यवहारात एकुण 4,50,000 ₹ रक्कम घेतली. यानंतर दशरथ यांनी परमेश्वर यांना कराराप्रमाणे ऊसतोड मजुर पुरविण्याबाबत वेळोवेळी विचारणा केली असता परमेश्वर यांनी मजुर न पुरविता घेतलेली नमूद रक्कमही परत न करता दशरथ यांची आर्थिक फसवणकू केली. अशा मजकुराच्या दशरथ गायकवाड यांनी दि. 26.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web