एसटी बसवर केलेल्या दगडफेक प्रकरणी तीन गुन्हे दाखल

 
crime

 उस्मानाबाद  :  शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी पीक विमा संदर्भात केलेल्या आमरण उपोषणाची राज्य सरकारने दखल न घेतल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी तीन बसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


एस.टी. बस क्र. एम.एच. 20 बीएल 4239, एस.टी. बस क्र. एम.एच. 14 बीटी 4018, एस.टी. बस क्र. एम.एच. 14 बीटी 4985 व एस.टी. बस क्र. एम.एच. 20 बीएल 2464 या चार बसेस दि. 28.10.2022 रोजी 16.45 ते 21.45 वा. दरम्यान उस्मानाबाद शहरातून तीन वेगवेगळ्या रस्त्याने प्रवासी घेउन जात असताना 9 अनोळखी इसमांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याच्या उद्देशाने नमूद एसटी बसेसच्या काचावर दगड फेकून मारुन बसच्या समोरील तसेच मागील काच फोडून आर्थिक नुकसान केले. यावरुन बस चालक- 1)त्रिंबक स्वामी, तुळजापूर बस आगार 2)औदुंबर काळे, उस्मानाबाद बस आगार 3)समाधान गिराम, सोलापूर बस आगार या तीघांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 336, 427 सह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक आधिनियम कलम- 3 अंतर्गत उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्र. 327, 328/ 2022 हे दोन गुन्हे तर आनंदनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्र. 311/2022 हा एक गुन्हा असे तीन गुन्हे नोंदवले आहेत.

लोहारा आणि ढोकी येथे हाणामारी 

 लोहारा : मोघा (बु.), ता. लोहारा येथील- नितीन बालाजी जाधव, वय 30 वर्षे हे दि. 27.10.2022 रोजी 16.40 वा. सु. मोघा (बु.) येथील आपल्या शेतात होते. यावेळी गावकरी- भरत श्रीपती जाधव, शरद श्रीपती जाधव यांसह तोरंबा ग्रामस्थ- शंभु दिगंबर खंडाळे, मारुती मातोळे व मुर्शदपुर, ता. लोहारा येथील- ज्ञानेश्वर बळी मोरे या सर्वांनी संगणमताने नितीन यांच्या शेतात जाउन त्यांच्या शेतातून रहदारीय रस्ता देण्याच्या कारणावरुन नितीन यांसह त्यांची वडील- बालाजी जाधव या दोघांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन रहदारीस रस्ता न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नितीन जाधव यांनी दि. 28.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : तेर, ता. उस्मानाबाद येथील- भगवान शिवराम मोरे, वय 65 वर्षे हे दि. 28.10.2022 रोजी 13.00 वा. सु. म्होतरवाडी शिवारातील आपल्या शेतात होते. यावेळी तेर ग्रामस्थ- अभिमन्यु विठोबा जमाटे यांनी तेथे जाउन गावातीलच भागवत मोरे यांची जमीन भगवान मोरे यांनी खरेदी केल्याच्या कारणावरुन अभिमन्यु यांनी भगवान यांना शिवीगाळ करुन त्‍यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस कुऱ्हाडीने मारुन त्यांना गंभीर जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या भगवान मोरे यांनी दि. 28.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web