उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल
मुरुम : आष्टाकासार, ता. लोहारा येथील सुरेश नागनाथ वाघमोडे, चंद्रकांत वाघमोडे, विठ्ठल वाघमोडे, नितीन वाघमोडे, आण्णाप्पा वाघमोडे या सर्वांनी दि. 06 जून रोजी 18.00 वा. सु. आष्टाकासार गट क्र. 155/176 मधील शेतात शेत मशागतीच्या कारणावरुन भऊबंद- महादेव नागनाथ वाघमोडे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या महादेव वाघमोडे यांनी दि. 13 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : शिंदेवाडी, ता. उस्मानाबाद येथील दत्ता शिंदे, रामा शिंदे, देवानंद शिंदे, नितीन शिंदे, लक्ष्मण शिंदे यांच्या व केशेगाव ग्रामस्थ- बबन दशरथ शिंदे यांच्यात शेतातील कॅनालच्या पाण्यावरुन वाद आहे.यातून शिंदेवाडी येथील नमूद लोकांनी दि. 13 जून रोजी 10.00 वा. सु. केशेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर बबन शिंदे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले. यावेळी बबन यांच्या बचावास आलेला त्यांचा मुलगा- सागर यांसही नमूद लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बबन शिंदे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : तळ्यातील मासे पकडू देत नसल्याच्या कारणावरुन भोंजा, ता. परंडा येथील अनिल सरवदे, दयानंद सरवदे, लक्ष्मी सरवदे, महेश सरवदे या सर्वांनी दि. 13 जून रोजी 15.00 वा. सु. गावकरी- बाबासाहेब गोपीनाथ कांबळे यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बाबासाहेब कांबळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.