उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

तुळजापूर  : संगमनेर, ता. बार्शी येथील रामानंद गणपत पाटील यांना ढेकरी, ता. तुळजापूर येथील अभिजीत चंद्रकांत ढवळे यांनी दि. 28.05.2022 रोजी 20.00 वा. सु. आपल्या घरी नेले. दरम्यान पुर्वीच्या वादातून अभिजीत ढवळे यांसह त्यांचे पिता व गंधोरा येथील जीवन पाटील अशा तीघांनी रामानंद पाटील यांना धारदार हत्याराने डोक्यात मारुन लोखंडी गजाने व काठीने मारहान केली. यात रामानंद यांच्या उजव्या हाताचे हाड मोडल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या रामानंद पाटील यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 342, 324, 323, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : ढोकी रोड, कळंब येथील मुज्जौदीन मैनोद्दीन शेख यांच्या कुटूंबीयांचा भाऊबंद- नशीरोद्दीन मैनोद्दीन शेख यांच्या कुटूंबीयांशी जुन्या वादावरुन व दुकानाच्या मालकी हक्काच्या कारणावरुन दि. 04 जून रोजी 09.30 ते 12.30 वा. दरम्यान राहत्या गल्लीत वाद झाला. या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन दोन्ही कुटूंबातील स्त्री- पुरुषांनी परस्पर विरोधी कुटूंबीयांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मुज्जौदीन शेख व नशीरोद्दीन शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत स्वतंत्र दोन गुन्हे नोंदवले आहेत.

लोहारा  : माकणी येथील माणिक कुसळकर हे दि. 03 जून रोजी 20.30 वा. सु. आपल्या अंगणात कुटूंबासह बसले होते. यावेळी गावकरी- काशीनाथ जाधव, गोविंद, अभिमन्यु, निलेश, महादेव कुसळकर यांनी बांधकामाच्या जुन्या वादातून सोबत आणलेल्या रिकाम्या काचेच्या बाटल्या माणिक यांच्या अंगणात फोडल्या. तसेच माणिक यांच्यासह त्यांच्या कुटूंबीयांस शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या माणिक कुसळकर यांनी दि. 04 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 447, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                   

From around the web