उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल
उस्मानाबाद : आंबेहोळ, ता. उस्मानाबाद येथील समीर लतीफ शेख हे दि. 28 मे रोजी 17.00 वा. सु. गावातील चौकात थांबले होते. यावेळी भाऊबंद- महंमद शेख, असलम शेख, अफजल शेख, अज्जु शेख यांनी तेथे जाउन आर्थिक व्यवहाराच्या व जुन्या वादाच्या कारणावरुन समीर शेख यांना शिवीगाळ करुन, लोखंडी गज, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या समीर शेख यांनी दि. 29 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : हासेगाव, ता. कळंब येथील सागर हरीभाउ खरडकर यांनी दि. 29 मे रोजी 16.00 वा. सु. भाऊबंद- शिवलिंग मन्मथ खरडकर यांच्या गट क्र. 365 च्या शेतातील ऊस पिकातून ट्रॅक्टर घातला. यावर शिवलिंग यांनी सागर यांना हटकले असता सागर यांसह हरीभाऊ खरडकर, मंगल खरडकर यांनी शिवलिंग यांना शिवीगाळ करुन दगडाने मारहान करुन जखमी केले. यावेळी शिवलिंग यांच्या बचावास सरसावलेल्या त्यांच्या पत्नी- बालिका यांसही मारहान केली. अशा मजकुराच्या शिवलिंग खरडकर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : भुखंडावर मंडप उभा केल्याच्या व त्या भुखंडाच्या मालकीच्या कारणावरुन काळेगाव, ता. तुळजापूर येथील पाटील कुटूंबातील आकाश, अविनाश, संगीता, एैश्वर्या या सर्वांनी दि. 24 मे रोजी 11.00 वा. सु. सुनिता धनाजी काटवटे यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच संगीता यांनी सुनिता यांच्या हाताच्या बोटावर ब्लेडने वार करुन जखमी केले व त्यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाचे सुवर्ण मंगळसुत्र काढून घेतले. अशा मजकुराच्या सुनिता काटवटे यांनी दि. 29 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 327, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.