उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

शिराढोण  : करंजकल्ला, ता. कळंब येथील नितीन अर्जुन झोंबाडे यांनी दि. 18.02.2022 रोजी 17.30 वा. सु. गावातील एका हॉटेलसमोर गावकरी- दिनेश सुकुमार पवार, दशरथ पवार, बळी पवार, नंदकुमार पवार, सतिष सुंदर पवार यांना मजुरीचे पैसे मागीतले. यावर नमूद पवार कुटूंबीयांनी चिडून जाउन नितीन झोंबाडे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन ऊसाने व दगडाने मारहान करुन त्यांना जखमी केले. तसेच कुऱ्हाड, चाकुचा धाक दाखवून नितीन यांच्या खिशातील 520 ₹ काढून घेतले व नितीन यांच्या हातात विद्युत पंप देउन त्यांचे छायाचित्र काढून, “तुझ्या विरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करतो.” असे धमकावले. अशा मजकुराच्या नितीन झोंबाडे यांनी दि. 22.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 327, 324, 323, 504, 506 सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            तर याच प्रकरणात सतिष सुंदर पवार, रा. करंजकल्ला, ता. कळंब यांच्या शेत विहीरीतील 5 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप दि. 18.02.2022 रोजी 17.30 वा. सु. गावकरी-  नितीन अर्जुन झोंबाडे हे चोरुन नेत असताना सतिष पवार यांना आढळुन आले. अशा मजकुराच्या सतिष पवार यांनी दि. 22.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 511 अंतर्गत गुन्हा नोंदवलाआहे.

येरमाळा : पानगाव, ता. कळंब येथील बालाजी भैरु बाराते हे दि. 22.02.2022 रोजी 16.15 वा. सु. पानगाव गट क्र. 57 मधील शेतात होते. यावेळी गावकरी- धुंभर कुटूंबातील अंकुश, सुमित, रोहीत, पांडुरंग, दशरथ या सर्वांनी तेथे जाउन शेतजमीन वाटणीच्या कारणावरुन बालाजी बाराते यांना शिवीगाळ करुन काठीने मारहान करुन त्यांना जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बालाजी बाराते यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 147, 148, 149, 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : शिवपुरी कॉलनी, उमरगा येथील अमन अफसर पटेल, अभिजीत शिवाजी पाटील, सुमित बालाजी पवार, सुनिल बाळासाहेब सुर्यवंशी या सर्वांनी जुन्या भांडणावरुन दि. 21.02.2022 रोजी 17.30 वा. सु. जिजाउ चौक, उमरगा येथे कॉलनीतीलच- समर्थ जगदीश सुरवसे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच अभिजीत पाटील यांनी समर्थ यांच्या डोक्यात लोखंडी गज मारुन त्यांना जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या समर्थ सुरवसे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web