उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

येरमाळा : बावी, ता. वाशी येथील श्रीमंत छबु शिंदे यांनी दि. 06.02.2022 रोजी 10.30 वा. सु. राहत्या गल्लीत पुर्वीच्या वादावरुन भाऊ- वसंत शिंदे यांना शिवीगाळ करुन डोक्यात कुऱ्हाड मारुन त्यांना जखमी केले. यावेळी वसंत यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या पत्नी व मुलासही श्रीमंत यांनी शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या वसंत शिंदे यांनी दि. 07 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : तिर्थ (खुर्द), ता. तुळजापूर येथील रामदास महादेव पवार हे पत्नी व मुलासह दि. 06.02.2022 रोजी 18.00 वा. सु. आपल्या घरासमोर थांबले होते. यावेळी गावकरी- निलेश कानडे, राम कानडे, रोहीत कानडे, सुलोचना कानडे, सविता कानडे, उमाकांत कानडे, चंद्रकांत कोठावळे या सर्वांनी पवार राहत असलेल्या भुखंड मालकीच्या कारणावरुन पवार यांच्या घरासमोर जाउन रामदास पवार यांसह त्यांची पत्नीस व मुलगा- नेताजी यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, खोऱ्या, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रामदास पवार यांनी दि. 07 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 144, 147, 148, 149, 324, 323, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : कळंब तालुक्यातील वाटवडा ग्रामस्थ- येवतकर कुटूंबातील अभिजीत, बाळु, सुहास, आशिष, महानंदा, सुलभा या सर्वांनी पुर्वीच्या वादावरुन दि. 06.02.2022 रोजी 09.00 वा. सु. गावकरी- परमेश्वर बप्पा आगळे यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, कुऱ्हाड, दगड, काठीने मारहान करुन गंभीर जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या परमेश्वर आगळे यांनी दि. 07 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 326, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web