उस्मानाबादेत बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न करणारे तिघे गजाआड
उस्मानाबाद - आंध्र प्रदेशातील अनोळखी इसमांनी दि. 06.09.2022 रोजी 11.00 वा. सु. सांजा चौक, उस्मानाबाद येथील बालगृहात असलेल्या बालकांना बनावट आधार ओळखपत्र व जन्म दाखल्यांच्या सहायाने ताब्यात घेउन (अपहरन करुन) त्या बालकांचा अपव्यापार करण्याचा प्रयत्न केला होता. यावरुन बालकल्याण समिती अध्यक्ष- विजकुमार माने, रा. उस्मानाबाद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 468, 471, 370, 511, 34 अंतर्गत आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा क्र. 262 /2022 हा दि. 06.09.2022 रोजी नोंदवला आहे.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता . पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- अमोल पवार, पोउपनि- संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- साईनाथ आशामोड, महिला पोलीस अंमलदार- वैशाली सोनवने, रंजना होळकर यांच्या पथकाने दि. 06.09.2022 रोजी सांजा रोड, उस्मानाबाद येथील बालकल्याण समीती अध्यक्ष- श्री. विजयकुमार माने यांच्याशी संपर्क साधुन सांजा रोड परिसरातून एस. लक्ष्मी कृष्णा, रा. कुरनूल, आंध्र प्रदेश हिस ताब्यात घेउन त्या महिलेकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता ती पोलीसांना समाधानकारक उत्तरे देत नव्हती. तीच्या ताब्यात 03 बनावट आधार कार्डसह चोरीचा एक मोबाईल व 42,000 ₹ रोख रक्कम मिळुन आली.
तीच्या ताब्यातील मोबाईलवरुन पोलीसांनी तांत्रिक विश्लेषण करुन उस्मानाबाद शहरातील पोतदार इंटरनॅशनल स्कुल समोरील राष्ट्रीय महामार्गवरुन तीचे साथीदार दोन पुरुष यांस ताब्यात घेतले. पोलीसांनी त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी आपली नावे- एस. कृष्णा उर्फ गंगाधार सुभाराव, वय 45 वर्षे व एस. साई व्यंकटेश, वय 28 वर्षे, दोघे रा. कुरनुल, आंध्र प्रदेश असे असल्याचे सांगीतले. त्यांकडे अधिक तपास केला असता त्यांच्या ताब्यात 02 बनावट आधार कार्ड, चोरीचे 5 मोबाईल व बनावट वाहन परवान्यासह एक बोलेरो पिकअप मिळाल्याने पोलीसांनी ते हस्तगत करुन त्या तीघांस ताब्यात घेउन पुढील कार्यवाहीस्तव आनंदनगर पोलीसांच्या ताब्यात दिले. आरोपीतांना मा. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या तीघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून सदर गुन्ह्याचा तपास सपोनि- चैनसिंग गुसिंगे हे करत आहेत.