चोरीच्या ट्रॅक्टर- ट्रेलर व सोयाबीनसह तीन आरोपी अटकेत

 
as

उस्मानाबाद  : बावी, ता. वाशी येथील- बळीराम महादेव शिंदे यांचा अंदाजे 3,50,000 ₹ किंमतीचा ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एएल 2836 हा गावातील मारुती मंदीराजवळून अज्ञात व्यक्तीने दि. 17.11.2022 रोजी 19.00 ते दि. 18.11.2022 रोजी 06.00 वा. दरम्यान चोरुन गावकरी- नामदेव रामकृष्ण शिंदे यांच्या बावी गट क्र. 2 मधील शेतातील गुदामाचे कुलूप तोडून आतील 33 पोती सोयाबीन गुदामाजवळील त्यांच्या ट्रॉलीमध्यून चोरुन नेले होते. अशा मजकुराच्या नामदेव शिंदे यांनी दि. 18.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा क्र. 311/2022 हा भा.दं.सं. कलम- 461, 380, 379 अंतर्गत नोंदवला आहे.

            गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे झिन्नर शिवार पारधी विढी, वाशी येथील- संतोष आप्पा चव्हाण यासह त्यांच्या दोन साथीदारांना गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही तासांत झिन्नर पारधी पिढी येथून ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून नमूद चोरीचे सोयाबीन, ट्रॉली व ट्रॅक्टर असा एकुण 4,93,455 ₹ चा माल जप्त केला. तसेच पुढील कार्यवाहिस्तव नमूद तीघांना चोरीच्या मालासह येरमाळा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

            सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व  अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पोनि- . यशवंत जाधव, पोउपनि- . संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, अजित कवडे, बबन जाधवर, अशोक कदम यांच्या पथकाने केली आहे. 


 

From around the web