शेतातील विद्युत पंप चोरी करताना चोरटे गावकऱ्यांच्या ताब्यात

 

परंडा  : कुंभेजा, ता. परंडा येथील- अंगद रामदास कोकाटे, वय 40 वर्षे हे दि. 15.12.2022 रोजी 21.30 वा. सु. सिना नदीपात्राच्या कडेला असलेल्या आपल्या शेतात विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले होते. यावेळी तेथे कोकाटे यांचे 10 अश्वशक्ती व 7.5 अश्वशक्ती क्षमतेचे असे 02 विद्युत पंप दोन पुरुष एका विना नोंदणीक्रमांकाच्या मोटारसायकलवरुन घेउन जात असल्याचे कोकाटे यांना आढळले. दरम्यान कोकाटे यांना पाहून ते दोघे तेथून पोबारा करत असताना कोकाटे यांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्या दोघांना पकडून परंडा पोलीसांच्या ताब्यात दिले. यावर पोलीसांनी त्यांची विचारपुस केली असता त्यातील एकाचे नाव- सोमनाथ शिवाजी आडसुळ, रा. सालसे, ता. करमाळा, जि. सोलापूर येथील असून दुसरा हा अल्पवयीन (विधी संघर्षगृस्थ बालक) असल्याचे समजले. यावर पोलीसांनी त्या अल्पवयीन बालकाची रवानगी सुधारगृहात करण्याची तजबीज केली असून सोमनाथ यास अटक करुन त्यांच्याविरुध्द परंडा पो.ठा. येथे- गुन्हा क्र. 369/2022 हा भा.दं.सं. कलम- 379, 511, 34 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.

 ईटकूरमध्ये चोरी 

 कळंब  : ईटकुर, ता. कळंब येथील- भागवत दामोदर बोराडे, वय- 53 वर्षे यांच्या बंद घराचे कुलूप एका शेजारील गावच्या एका संशयीत व्यक्तीने दि. 15.12.2022 रोजी 11.30 ते 14.30 वा. दरम्यान तोडून आत प्रवेश करुन लाकडी कपाटातील 180 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 7,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 7,87,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या भागवत बोराडे यांनी दि. 16.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

 

From around the web