तुळजापुरात देवीच्या दरबारात चोरांचा सुळसुळाट 

चोरीच्या तीन  मोबाईल फोनसह चार आरोपी ताब्यात
 
s

तुळजापूर   : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव सध्या सुरु आहे. देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात मोठी गर्दी झाली असून या गर्दीचा फायदा उठव  चोरटे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत.दररोज मोबाईल , पैसे आणि दागिन्यांची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे, भाविकांत भीती निर्माण झाली आहे. .  

आलुरहट्टी, ता. जि. धावनगेरे, राज्य- कर्नाटक येथील- कृष्णा नागा नाईक, वय 48 वर्षे हे दि. 02.10.2022 रोजी 16.30 वा. सु. तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीर परिसरातील मातंगी मंदीराजवळ असताना चार अनोळखी इसमांनी कृष्णा नाईक यांना ठार मारण्याची धमकी देउन त्यांच्या जवळील अंदाजे 15,000 ₹ किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन हिसकावून चोरुन नेला होता. यावर कृष्णा नाईक यांनी तुळजापूर पोलीस ठाणे गाठून भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा क्र. 354/2022 हा नोंदवला आहे.

            दरम्यान नवरात्र उत्सव निमीत्ताने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तुळजापूर शहरात गस्तीस होते. यावेळी पथकाने गोपनीय माहितीवरुन तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गांधीनगर, बीड येथील- 1)किरण संताराम गुंजाळ 2)योगेश सर्जेराव गायकवाड 3)ऋषीकेश बंडू जाधव 4)विशाल चारु1 भोसले या चौघांना 19.00 वा. सु. तुळजापूर येथील कमान वेस परिसरातून ताब्यात घेउन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ  नमूद चोरीतील विवो मोबाईल फोन सह अन्य चोरीचे दोन मोबाईल फोन आढळल्याने पथकाने ते हस्तगत करुन पुढील कारवाईस्तव नमूद चौघांना चोरीच्या मोबाईल फोनसह तुळजापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगीरी  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थागुशा च्या पोनि- यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- . शैलेश पवार, पोउपनि- . संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- हुसेन सय्यद, जावेद काझी, अमोल चव्हाण, अशोक ढगारे, शैला टेळे, रविंद्र आरसेवाड यांच्या पथकाने केली आहे.

From around the web