घाटंग्री शिवारात कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दरवाजाच्या चोरी

 मुद्देमालासह तीन आरोपी गजाआड 
 
ds

उस्मानाबाद  : घाटंग्री शिवारातील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दरवाजाच्या अंदाजे 90- 100 कि.ग्रॅ. वजनाच्या 12 लोखंडी पाट्या दि. 23.04.2022 ते 11.05.2022 रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या होत्या. यावरुन शाखा अभियंता, लघु पाटबंधारे विभाग - रावसाहेब पिंपळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गु.र.क्र. 70/2022 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            गुन्हा तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- शैलेश पवार, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, शैला टेळे, पोकॉ- योगेश कोळी, पठाण यांच्या पथकाने गतीमान तपास केला. यातून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे साठे चौक, उस्मानाबाद येथील कैलास सिताराम पारडे, वय 45 वर्षे यांसह अन्य दोघांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून नमूद चोरीच्या मालासह गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन जप्त करुन त्यांच्या उर्वरीत साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.  

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना 

शिराढोण  : देवळाली, ता. कळंब येथील तानाजी व्यंकटराव माने यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 09- 10 मे रोजी दरम्यानच्या रात्री तोडून घरातील कापाटात असलेले 201 ग्रॅम सुवर्ण दागिने व 5,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या तानाजी माने यांनी दि. 11 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : सिंदफळ शिवारातील मातोश्री धाब्यासमोर लावलेल्या मीनी ट्रकमधील सीएटची दोन टायर दि. 09- 10 मे रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या मिनी ट्रक चालक- दिलीप जगदीशचंद्र मोदी, रा. इंदोर, राज्य- मध्यप्रदेश यांनी दि. 11 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : पापनासनगर, उस्मानाबाद येथील बारीकराव नाना पवार यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 वाय 1082 ही दि. 09- 10 मे रोजी दरम्यानच्या रात्री दत्तनगर पारधी पिढी, ढोकी येथून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या पवार यांनी दि. 11 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : सांजा, ता. उस्मानाबाद येथील रविंद्र आप्पासाहेब सुर्यवंशी यांचे घर दि. 10 मे रोजी 11.45 ते 18.45 वा. दरम्यान कुलूप बंद होते. ही संधी साधून अज्ञात व्यक्तीने घराच्या पाठीमागील दरवाजाच्या वरुन आत प्रवेश करुन पलंगातील एका कप्प्यातील 10 ग्रॅम सुवर्ण दागिने व 55 ग्रॅम चांदीचे दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या सुर्यवंशी यांनी दि. 11 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web