वाशी आणि येरमाळा येथे चोरीच्या घटना 

 
crime

वाशी  : लोणखस, ता वाशी येथील रवि भास्कर जगताप व बब्रुवान दत्ता अनभुले यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 03.09.2022 रोजी 23.00 ते दि. 04.09.2022 रोजी 04.30 वा. दरम्यान तोडून जगताप व अनभुले यांच्या घरातील 32,000 ₹ रोख रक्कम व अनभुले यांच्या घरातील 7 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने असा एकुण 57,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या रवि जगताप यांनी दि. 04.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : खामकरवाडी, ता. वाशी येथील मारुती मंदीरातील अंदाजे 15 ते 20 हजार रक्कम जमा झालेली 11 कि.ग्रॅ. वजनाची एक लोखंडी दानपेटी अज्ञात व्यक्तीने दि. 03.09.2022 रोजी 21.00 ते दि. 04.09.2022 रोजी 07.00 वा. दरम्यान चोरुन नेली. अशा मजकुराच्या खामकरवाडी ग्रामस्थ- सुजीत बाळासाहेब होळे यांनी दि. 04.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web