उस्मानाबाद जिल्ह्यात सहा ठिकाणी चोरीच्या घटना 

 
crime

शिराढोण  : केज, जि. बीड येथील सचित्र बबन जाधव, वय 30 वर्षे हे दि. 26.04.2022 रोजी रात्री 01.00 वा. सु. शिराढोन शिवारातील कळंब रस्त्याने जॉन डिअर ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एएस 7812 हा चालवत जात होते. यावेळी एका निळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये आलेल्या पाच अनोळखी व्यक्तींनी कान ट्रॅक्टरला आडवी लाउन सचित्र जाधव यांना ट्रॅक्टरमधून खाली आढून मारहान करुन बळजबरीने कारमध्ये घालून नेउन त्यांच्या खिशातील 100₹ घेउन सिरसाळ, ता. परळी येथे कारमधून उतरवले. तसेच जाधव यांच्या ट्रॅक्टरसह 2 ट्रेलरही चोरुन घेउन गेले. अशा मजकुराच्या सचित्र जाधव यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 395, 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत भाटशिरपुरा, ता. कळंब येथील शिवाजी उध्दवराव गायकवाड, वय 65 वर्षे यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 25- 26.04.2022 रोजी दरम्यानच्या रात्री तोडून घरातील सोने- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 72,300 ₹ माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या शिवाजी गायकवाड यांनी दि. 26 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : पारगाव शिवारातील इंडस कंपनीच्या मनोऱ्याचे जिओ केबल 30 मीटरचे 9 नग व एअरटेल केबल 30 मीटरचे 3 नग दि. 06.04.2022 रोजी 00.40 ते 02.00 वा. दरम्यान तसेच घाटपिंपरी गावातील जिओ केबल 30 मीटरचे 7 नग व एअरटेल केबल 30 मीटरचे 2 नग दि. 12.04.2022 रोजीच्या रात्री असे एकुण 270 मीटर केलब अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या महादेव पंडीत ढवण, रा. खंडाळा, ता. तुळजापूर यांनी दि. 26 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : कौडगाव, ता. उस्मानाबाद येथील महादेव ज्ञानदेव भंडारे हे दि. 24.04.2022 रोजी 14.00 वा. सु. नेहरु चौक, उस्मानाबाद येथील मार्केटमध्ये असतांना गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या विजारीच्या पाठीमागील खिशातील कागदपत्रे व 3,500 ₹ असलेले पॉकेट भंडारे यांच्या नकळत चोरुन नेले. अशा मजकुराच्या महादेव भंडारे यांनी दि. 26 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील बाळासाहेब शाहुराव पाटील हे कुटूंबीयांसह दि. 25.04.2022 रोजी 09.00 ते 21.00 वा. दरम्यान बाहेर गावी गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून सोने- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 69,350 ₹ माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या बाळासाहेब पाटील यांनी दि. 26 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत लातूर ते उस्मानाबाद प्रवासी वाहतुक करत असलेली एसटी बस क्र. एम.एच. 20 बीएल 0860 ही दि. 25.04.2022 रोजी 20.15 वा. सु. अक्षय मेटल चौक, उसमानाबाद येथे आली असता आयान कुरेशी, रा. उस्मानाबाद यांसह अन्य दोन अनोळखी व्यक्ती यांनी बसच्या उजव्या बाजूने दगड मारुन दोन क्रमांकाच्या खिडकीची काच फोडून बसचे आर्थिक नुकसान केते. तसेच यात बसमणील दोन प्रवासीही जखमी झाले. अशा मजकुराच्या बस चालक- शाम बळीराम राउत यांनी दि. 26 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- े336, 337, 427, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web