उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरीची घटना
तुळजापूर : चिंचोली, ता. तुळजापूर येथील- संदिप पांडुरंग कदम यांच्या मस्के प्लॉटींक, तुळजापूर येथील मेहुण्याच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 22.12.2022 रोजी 17.00 ते दि. 23.12.2022 रोजी 09.00 वा. दरम्यान तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 7.5 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 40,000 ₹ रक्कम असा एकुण 70,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या संदिप कदम यांनी दि. 23.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : शिंगोली, ता. उस्मानाबाद येथील- समाधान अरुण शितोळे यांच्या शिंगोली गट क्र. 12 मधील शेतातील खोलीचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून दि. 10.12.2022 रोजी 18.00 ते दि. 11.12.2022 रोजी 06.00 वा. दरम्यान गावातीलच एका संशयीत व्यक्तीने त्या खोलीत प्रवेश करुन आतील तुषारसिंचन नोजल- 8, किसान कंपनीचे संच व दोन लोखंडी विळे असा एकुण 5,700 ₹ चे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या समाधान शितोळे यांनी दि. 23.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : तेर, ता. उस्मानाबाद येथील- राजेंद्र अभिमन्यु माने यांच्या तेर गट क्र. 869 मधील शेत विहीरीवरील एमटेक कंपनीचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप व शेजारील एका शेतकऱ्याच्याही शेत विहीरीवरील कॉमटन कंपनीचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप दोन्ही पंपाची अंदाजे 25,000 ₹ किंमत असलेले असे एकुण दोन पंप दि. 17.12.2022 रोजी 19.00 ते दि. 18.12.2022 रोजी 07.30 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या राजेंद्र माने यांनी दि. 23.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.