उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीची घटना 

 
crime

अंबी  : इनगोंदा, ता. परंडा येथील- मरिबा शंकर रंदिल यांची अंदाजे 31,000 ₹ किंमतीच्या डिस्कव्हर मोटारसायकल क्र. एम.एच. 15- 6825 व हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 15- 5947 अशा दोन मोटारसायकल दि. 10.09.2022 रोजी 20.30 वा. ते दि. 11.09.2022 रोजी 00.30 वा. दरम्यान त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या मरिबा रंदिल यांनी दि. 13.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : राघुचीवाडी, ता. उस्मानाबाद येथील- पद्माकर अंकुश हजारे यांची अंदाजे 15,000 ₹ किंमतीची मोटारसायकल क्र. एम.एच. 13 यु 9485 ही दि. 12.09.2022 रोजी 01.00 ते 05.00 वा. दरम्यान राघुचीवाडी गट क्र. 538 मधील शेतातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या पद्माकर हजारे यांनी दि. 13.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : पुजारीनगर, तुळजापूर येथील- मंगल सुनिल गवळी ह्या दि. 13.09.2022 रोजी 13.00 ते 13.30 वा. दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तुळजापूर येथील शाखेत असताना गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने श्रीमती गवळी यांच्या जवळील पिशवीतील 70,000 ₹ रोख रक्कम गवळी यांच्या नकळत चोरुन नेली. अशा मजकुराच्या मंगल गवळी यांनी दि. 13.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : हंगरगा (नळ), ता. तुळजापूर येथील- ताहेराबी इलाही शेख यांसह त्यांच्या गावातील अन्य एका व्यक्तीच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 13.09.2022 रोजी रात्री 00.01 ते 06.00 वा. दरम्यान तोडून दोघांच्या घरातील एकुण 25.5 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, 36,000 ₹ रोख रक्कम व घरासमोरील हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एआर 7996 असा एकुण 1,26,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या ताहेराबी शेख यांनी दि. 13.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web