वडगाव , शेलगाव, मुरूम येथे चोरीची घटना
उस्मानाबाद : वडगाव (सि.), ता. उस्मानाबाद येथील- प्रविण प्रल्हादराव माने यांची अंदाजे 50,000 ₹ किंमतीची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एव्ही 2445 ही दि. 15.10.2022 रोजी 19.30 ते 06.00 वा. दरम्यान त्यांच्या घरासमोरुन तसेच त्यांचे शेजारी- धनाजी नवनाथ जाधव यांचे 9 पोती सोयाबिन व शेजारी- नागनाथ तुकाराम गायकवाड यांचा सॅमसंग मोबाईल फोन असा तीघांचा एकुण 80,000 ₹ चा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रविण माने यांनी दि. 15.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : शेलगाव (ज.), ता. कळंब येथील- गोवर्धन जनार्धन तवले यांची अंदाजे 25,000 ₹ किंमतीची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एए 7193 ही दि. 13.10.2022 रोजी 13.00 ते 16.30 वा. दरम्यान उपविभागीय अधिकारी कार्यालय, कळंब परिसरातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या गोवर्धन तवले यांनी दि. 15.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : मुरुम, ता. उमरगा येथील- रविंद्र अशोक फुगटे यांचा अंदाजे 70,000 ₹ किंमतीचा जॉनडीअर कंपनीचा रोटावेटर दि. 06.10.2022 रोजी 19.00 ते 07.10.2022 रोजी दरम्यान फुगटे यांच्या शेत गट क्र. 400/2 मधील शेतातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या रविंद्र फुगटे यांनी दि. 15.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.