उमरगा , येरमाळा येथे चोरीची घटना
उमरगा : जकेकुर, ता. उमरगा येथील- अमोल रमेश काळे यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएफ 1336 ही दि. 17.09.2022 रोजी 22.00 ते दि. 18.09.2022 रोजी 06.00 वा. दरम्यान त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अमोल काळे यांनी दि. 08.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : मलकापुर, ता. कळंब येथील- उमेश शिवाजी लोमटे यांच्या मलकापुर गट क्र. 97 मधील शेतातील लर्सन ॲण्ड ट्रोबो कंपनीचा अंदाजे 37,500 ₹ किंमतीचा 03 अश्वशक्ती क्षमतेचा सौर उर्जा पंप दि. 31.10.2022 रोजी 18.00 ते दि. 01.11.2022 रोजी 10.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या उमेश लोमटे यांनी दि. 08.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.