बावी आणि येरमाळा  येथे चोरी तर  सावळसुर येथे हाणामारी 

 
crime

उस्मानाबाद  : बावी, ता. उस्मानाबाद येथील- नागेश भारत वाघमारे व सचिन काशिनाथ तांबे या दोघांच्या अनुक्रमे बावी गट क्र. 6 व 278 मधील शेतातील अंदाजे 12,000 ₹ किंमतीच्या युनीटेक कंपनीच्या विद्युत मोटारी दि. 27.10.2022 रोजी 19.15 दि. 30.10.2022 रोजी 10.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या नागेश वाघमारे यांनी दि. 31.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
येरमाळा
 : तुळजापूर येथील- हेमा विनोद कदम, वय 30 वर्षे या दि. 31.10.2022 रोजी इंदापूर ते तुळजापूर असा एसटी बस क्र. एम.एच. 20 बीएल 1710 ने प्रवास करत होत्या. दरम्यान बस 11.00 वा. सु. येरमाळा बस स्थानक येथे आली असता हेमा या बसलेल्या आसनाजवळ बसलेल्या अनोळखी दोन महिलांनी गर्दीचा फायदा घेउन हेमा यांच्या नकळत त्यांच्या बॅगमधील अंदाजे 1,20,000 ₹ किंमतीचे 60 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या हेमा कदम यांनी दि. 31.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
सावळसुर येथे हाणामारी 
 
उमरगा
 : सावळसुर, ता. उमरगा येथील- व्यंकट गोविंद यमगर, वय 60 वर्षे हे दि. 27.10.2022 रोजी 13.30 वा. सु. सावळसुर येथील आपल्या शेतात पिकाची काढणी करत होते. यावेळी गावकरी- शिवराज ढोले, कृष्णा ढोले, पवन ढोले, निलकंठ ढोले, शंकर ढोले, बुध्दीवंत बिराजदार, रुपेश बिराजदार, प्रकाश बिराजदार या सर्वांनी संगणमताने व्यंकट यमगर यांच्या शेतात जाउन शेतजमीनच्या जुन्यावादाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच ठार मारण्याच्या उद्देशाने व्यंकट यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या व्यंकट यमगर यांनी दि. 31.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 307, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web