उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी चोरी 

 
crime

उस्मानाबाद  : सचिन दत्तात्रय इंगळे, रा. शिक्षक कॉलनी, उस्मानाबाद यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल एम.एच. 25 एएन 3897 ही दि. 01 मे रोजी दुपारी 15.00 वा. सु. उस्मानाबाद बस स्थानकाजवळून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन दि. 2 मे रोजी भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : घाटंग्री येथील शहाजी शिंदे यांच्या शेतातील 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा पाणबुडी विद्युत पंप व एक नादुरुस्त विद्युत पंप दि. 28- 29.04.2022 रोजीच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या शहाजी यांनी दि. 02 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 रस्ता अपघात

नळदुर्ग  : शिरगापूर, ता. तुळजापूर येथील सौरभ गायकवाड यांनी दि. 28.04.2022 रोजी 10.30 वा. सु. राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील केरुर फाटा येथे मोटारसायकल निष्काळजीपने चालवल्याने दुभाजकास धडकली. या अपघातात त्यांच्या मोटारसायकलवर पाठीमागे बसलेले गावकरी- राम लिंबाजी बागडे, वय 23 वर्षे हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचे पिता- लिंबाजी बागडे यांनी दि. 02 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web