उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी, अपहरण गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

उस्मानाबाद : ठाकर वस्ती, येडशी, ता. उस्मानाबाद येथील संजय सोमनाथ नागटीळक यांची बजाज सी.डी. 100 मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एव्ही 3163 ही दि. 04- 05.02.2022 रोजी दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या संजय नागटीळक यांनी दि. 06 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपहरण 

उस्मानाबाद  : एक 13 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) कुटूंबीयांसह कळंब तालुक्यातील एका व्यक्तीच्या शेतात राहत होती. गावातीलच एका 21 वर्षीय तरुणाने दि. 05.02.2022 रोजी 11.00 ते 13.30 वा. सु. ती राहत असलेल्या गोठ्यातून अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दि. 06 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानाबाद  : अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी काल दि. 06.02.2022 रोजी 8 वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. या छाप्यादरम्यान 8 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायदा अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

1) कळंब पोलीसांनी 2 ठिकाणी छापे मारले यात वाकडी ग्रामस्थ- सुरवंता काळे या आपल्या घरासमोर गुळ- पाणी मिश्रीत हातभट्टी दारु निर्मीतीचा 400 लि. द्रव पदार्थ व 7 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या तर मस्सा ग्रामस्थ- सव्तशिला काळे या गाव शिवारात गुळ- पाणी मिश्रीत हातभट्टी दारु निर्मीतीचा 400 लि. द्रव पदार्थ बाळगलेल्या असतांना पथकास आढळल्या.

2) उमरगा पोलीसांनी 2 ठिकाणी छापे मारले असता यात मुळज, ता. उमरगा येथील दत्तु मंडले हे आपल्या घरासमोर 15 लि. हातभट्टी दारु बाळगलेले तर पळसगाव तांडा, ता. उमरगा येथील आबु राठोड हे गुंजाटी गावातील बस थांब्याजवळ 18 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असतांना पथकास आढळले.

3) भुम येथील बालाजी भोळे हे जवळा- ईडा रस्त्यालगतच्या एका हॉटेलजवळ 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 15 बाटल्या बाळगलेले असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.

4) वाघोली, ता. कळंब येथील रामा क्षिरसागर हे आपल्या घरासमोर 16 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असतांना येरमाळा पो. ठा. च्या पथकास आढळले.

5) सांजा, ता. उस्मानाबाद येथील लताबाई पवार या आपल्या घरासमोर 80 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या असतांना आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळल्या.

6) उंडरगाव, ता. लोहारा येथील दयानंद सुर्यवंशी हे आपल्या घरासमोर 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 15 बाटल्या बाळग्लेले असतांना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.

From around the web