भूममध्ये जुन्या वादातून एकाचा खून 

 
crime

भूम  : सोनगिरी, ता. भुम येथील- ऋषीकेश बाबासोब कुटे, वय 24 वर्षे यांसोबत शहाजी शिवाजी मारकड, वय 60 वर्षे हे दोघे दि. 12.10.2022 रोजी 08.45 वा. सु. भुम तालुक्यातील चिंचोली फाटा येथील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 13 सीडी 3539 ने प्रवास करत होते. 

यावेळी अजय शहाजी मुंडे, वय 30 वर्षे, रा. हिवर्डा, ता. भुम यांनी जुन्यावादाच्या कारणावरुन मेहुणे- ऋषीकेश कुटे यांना ठार मारण्याच्या उद्देशाने अजय यांनी ट्रक क्र. एम.एच. 22 एए 3458 हा ऋषीकेश हे चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला पाठीमागून धडकवला. या अपघातात ऋषीकेश यांच्या पाठीमागे बसलेले शहाजी मारकड हे मयत होउन ऋषीकेश हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या अजय मुंडे यांची पत्नी- सुरेखा अजय मुंडे यांनी दि. 13.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 307 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मालमत्ते विरुध्द गुन्हे

कळंब  : खापरदेव (हिरा), ता. घनसांगवी, जि. जालना येथील- रामनाथ गंगाराम झाकणे यांची अंदाजे 20,000 ₹ किंमतीची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 21 बीई 8782 व रामनाथ यांचे मामा- जगन देसाई यांची अंदाजे 14,000 ₹ किंमतीची स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 21 एसी 9649 अशा दोन मो.सा. दि. 12.10.2022 रोजी 19.00 ते दि. 13.10.2022 रोजी 04.00 वा. दरम्यान खोंदला शिवारातील रामनाथ झाकणे राहत असलेल्या पालाजवळून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या रामनाथ झाकणे यांनी दि. 13.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : उस्मानाबाद तालुक्यातील गोवर्धनवाडी शिवारात असलेल्या जॅकवेल फिल्टरच्या ब्लोररुमधील 7.5 अश्वाशक्ती क्षमतेचा व फिल्टर गाड्याची 3 अश्वाशक्ती क्षमतेचा असे दोन विद्युत पंप दोन्ही मिळुन अंदाजे 30,000 ₹ किंमतीचे पंप दि. 11.10.2022 रोजी 22.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या नवनाथ मधुकर नाईकवाडी, रा. विठ्ठलनगर, तेर यांनी दि. 13.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web