दैनिक एकमतला ३ लाख ७० हजारला लावला चुना
उस्मानाबादेत वसुली प्रतिनिधींवर गुन्हा दाखल
Apr 21, 2022, 20:01 IST

उस्मानाबाद : दैनिक एकमतला ३ लाख ७० हजारला लावला चुना लावणाऱ्या वसुली प्रतिनिधींवर उस्मानाबादेत गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरोगामी विचारांचे एकमत कार्यालय, उस्मानाबाद येथील शेखर संदिपान शेळके यांनी दि. 03.09.2021 ते 15.04.2022 या कालावधीत वेगवेगळे जाहीरातदार, वार्ताहर व वितरण एजन्सी यांच्याकडून वेळोवेळी थकीत बिलाची रक्कम वसुल करुन त्यांना रितसर संस्थेची पावती देउन वसुल करण्यात आलेली रक्कम संस्थेच्या बँक खात्यावर जमा न करता एकुण 3,70,283 ₹ रकमेचा स्वत:च्या पदाचा गैरवापर त्या रकमेचा अपहार करुन इंडो एन्टरप्रायजेस प्रा.लि. संस्थेची फसवणुक केली आहे.
अशा मजकुराच्या मच्छिंद्रनाथ रघुनाथ कदम यांनी दि. 20.04.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 408 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.