खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस सिनेस्टाइल पाठलाग करुन उरुळी कांचन येथून पकडले 

उस्मानाबाद स्थागुशा पोलिसांची  कामगिरी 
 
s

उस्मानाबाद - तालुक्यातील ढोकी पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला आरोपी केशव श्रीराम केंद्रे (वय 48, रा.फुलवळ ता.कंधार जि.नांदेड) यास उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करुन पकडले आहे. 

ढोकी पोलीस ठाण्यात 30 मार्च रोजी दाखल असलेल्या एका खुनाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे  पथकाने उरळीकांचन (जि.पुणे) येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला. पोलिसांना पाहुन पळून जात असताना सिनेस्टाइल पाठलाग करुन आरोपीस ताब्यात घेतले. 

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक निलंगेकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश पवार पोउपनि ओव्हळ पोना हुसेन सय्यद , अमोल चव्हाण मपोना शैला टेळे पोकॉ अविनाश मारलापल्ले साईनाथ आशमोड योगेश कोळी सुनिल मोरे ढेकणे चालक पोहेकॉ अरब चालक पोकॉ गोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

From around the web