तेरखेडा : खुनाच्या प्रत्नातील दोन आरोपी ताब्यात
येरमाळा : तेरखेडा ग्रामस्थ- शहाजी जगताप व पप्पु उकरंडे यांना दि. 16.04.2022 रोजी ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या पोटावर धारदार हत्याराने वार करुन खूनाचा प्रयत्न करणारा आरोपी- अतुल दत्तात्रय घोलप, रा. तेरखेडा याचा पोलीस शोध घेत होते. त्यास येरमाळा पो.ठा. चे सपोनि- श्री. दिनकर गोरे यांसह पोहेकॉ- कर्वे, पोकॉ- गुळमे यांच्या पथकाने दि. 30 मे रोजी राहुरी, जि. अहमदनगर येथून ताब्यात घेतले आहे.
शरीराविरुध्दचे गुन्हे
लोहारा : करजखेडा, ता. उस्मानाबाद येथील महादेव नारायण सुरवसे व पृथ्वीराज या दोघा पिता- पुत्रांसह गोगाव येथील धर्मराज भोसले यांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 29 मे रोजी 22.30 वा. सु. आरणी, ता. लोहार येथील दिनकर शिवाजी खरोसे यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लाकडी बॅट, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दिनकर खरोसे यांनी दि. 30 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.