उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात दहा जखमी 

 
crime

बेंबळी: अज्ञात चालकाने दि. 09 जून रोजी 04.30 वा. सु. करजखेडा येथील रस्त्यावर ट्रक क्र. एम.एच. 09 एफवाय 8589 ही पाठीमागील वाहनाकडे दुर्लक्ष करुन ट्रक धावत असलेली बाजू अचानकपने, निष्काळजीपने बदलून ब्रेक दाबल्याने हैदर रहेमानसाहाब शेख, रा. चाकुर, जि. लातुर हे चालवत असलेली कार त्या ट्रकला पाठीमागून धडकली. या अपघातात हैदर शेख यांसह कारमधील अन्य 4 प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या हैदर शेख यांनी दि. 16 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : खानापूर, ता. तुळजापूर येथील तानाजी शेकाप्पा धुते यांनी दि. 30.03.2022 रोजी 19.15 वा. सु. खानापूर शिवारातील काटगाव रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 13 डीएन 8977 ही निष्काळजीपने चालवल्याने काटगाव ग्रामस्थ- विष्णु म्हाळप्पा सोनटक्के हे चालवत असलेल्या मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एआर 2218 ला समोरुन धडकली. या अपघातात विष्णु यांच्या डाव्या दंडाचे हाड मोडल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या विष्णु सोनटक्के यांनी वैद्यकीया उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा ग्रामस्थ- अमेश राजेंद्र गरड व सुनिल अशोक गरड हे दोघे दि. 29.05.2022 रोजी 18.30 वा. सु. नाईकनगर फाटा येथील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एसजी 5258 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने एसटी बस क्र. एम.एच. 20 बीएल 2892 ही निष्काळजीपने चालवल्याने उमेश चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला समोरुन धडकली. या अपघातात उमेश यांसह सुनिल हे गंभीर जखमी होउन त्यांची मो.सा. ही घसरत जाउन रस्त्याबाजूस उभा असलेल्या चिंचोली येथील गोविंद जोमदे धडकल्याने तेही जखमी झाले. अशा मजकुराच्या उमेश गरड यांनी उपचारानंतर दि. 16 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web