तामलवाडी : चोरीच्या मालासह दोघे अटकेत

 
d

तामलवाडी-  हदिदतील शेत शिवारातील विदयुत उपसा पंप चोरीस गेल्या प्रकरणी  तामलवाडी पो.ठा. चे प्रभारी अधिकारी श्री. सचिन पं‍डित, पो.उप.नि. रमेश घुले, पोहेकॉ –गाढवे, पोशि- सुरनार, राठोड, सगर असे आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान पथकास गोपनीय खबर मिळाली कि, वडगाव (काटी) येथील तरुनांचा या चोरीशी संबंध आहे. यावरुन पथकाने काल दि. 8 एप्रिल रोजी गावातील दोन तरुनांना ताब्यात घेतले असता तामलवाडी पो. ठाणे गुन्हा क्र. 1, 51, 52/2022 या भा.द.सं कलम 379 नुसारच्या गुन्हयांतील चोरीच्या 4 पानबुडी विदयुत पंपासह एक एच.टी.पी पंप व एक फवारणी पंप त्यांच्या ताब्यात  आढळल्याने अटक केली आहे.      

चोरीचे चार गुन्हे दाखल 

येरमाळा  : मलकापुर ग्रामसथ – हौसेराव लोमटे यांच्या चोराखळी शिवार गट क्र. 649 मधील शेतातील शेडमध्ये दावनीला बांधलेली असलेली  एक गाय दि.6 एप्रिल रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याने भा.द.स 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

तामलवाडी : तामलवाडी येथील एका दुरसंचार दळणवळण मनो-याखालील यंत्रणा खोलीच्या जाळया दि.6 एप्रिल रोजी पहाटे अज्ञात व्यक्तीने तोडुन अमार राजा कंपनीच्या 24 बॅटरी चोरुन नेल्या. यावरुन सुरक्षा रक्षक महादेव ढवण यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

उस्मानाबाद  : वरुडा रस्त्यालगतच्या समर्थ नगरमधील निर्मला हिंगमिरे यांनी दि. 5 एप्रिल रोजी 22.30 वाजता डोक्याची मेहंदी धुन्याच्या वेळी गळयातील 15 ग्रॅम वजनाचा सुवर्ण हार अंगणातील कोप-यात ठेवला होता. तो हार दुस-या दिवशी सकाळी त्यांना ठेवल्या जागी न आढळल्याने त्याची कुणी तरी  अज्ञात व्यक्तीने चोरी केली असावी. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.द.स 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : डिकसळ ग्रामस्थ- अशोक गोरे यांच्या बाहेरुन कुलुपबंद असलेल्या घराचे कुलुप दि. 7 एप्रिल रोजी दुपारी अज्ञात व्यक्तीने तोडुन कपाटातील कप्पा तोडुन 37 ग्रॅम सुवर्ण दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.द.स 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web