भूममध्ये जुन्या वादावरुन तलवारीने वार, एकजण जखमी
भूम : आलंप्रभुनगर, भूम येथील- समाधान अभिमान कदम, वय 21 वर्षे हे दि. 16.12.2022 रोजी 22.30 वा. सु. गावातील साहिल पेट्रोलीयम किरकोळ विक्री केंद्राजवळ होते. यावेळी गावकरी- सुमित प्रमोद गवळी, बालाजी जणजित गाडे या दोघांनी तेथे जाउन जुन्यावादाच्या कारणावरुन समाधान यांना शिवीगाळ करुन त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने तलवारीने त्यांच्यावर वार केले असता समाधान यांनी बचावासाठी हात अडवा केल्याने त्यांच्या हातावर तलवार लागून गंभीर जखम झाली.
तसेच यावेळी समाधान यांच्या बचावास शेजारील- सचिन मस्कर यांनी धाव घेतली असता त्यांसही नमूद दोघांनी त्यांच्यावरही तलवारीने वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या समाधान कदम यांनी दि. 18.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 324, 34 सह शस्त्र कायदा कलम- 4,25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
भूम : कसबा, ता. भुम येथील- भिमराव भगवान जाधव, वय 60 वर्षे यांच्या शेतातील गोठ्यातून अंदाजे 32,175 ₹ किंमतीचे सुमारे 5 क्विंटल 85 कि.ग्रॅ. सोयाबीन दि. 15.12.2022 रोजी 19.30 ते 20.30 वा. दरम्यान भुम येथील एका संशयीत व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या भिमराव जाधव यांनी दि. 18.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.