भंडारवाडीत आई आणि मुलीची आत्महत्या

 
crime

 ढोकी : भंडारवाडी, ता. उस्मानाबाद येथील- रणजीत श्रीकांत मारकड यांनी गावकरी- सोमनाथ कुंडलीक ऐडके यांसह त्यांच्या कुटूंबीयांस वेळोवेळी सतत फोन करुन, तसेच त्यांच्या घराकडे सततर चकरा मारुन ऐडके यांच्या कुटूंबीयांस मानसिक त्रास दिला. या त्रासास कंटाळून सोमनाथ यांची पत्नी- अश्विनी, वय 35 वर्षे व मुलगी- वैशाली, वय 13 वर्षे या दोघींनी दि. 03.11.2022 रोजी 14.00 वा. पुर्वी सोमनाथ ऐडके कसत असलेल्या गावातील शेतात विषारी औषध पिउन आत्महत्या केली. अशा मजकुराच्या सोमनाथ ऐडके यांनी दि. 04.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 305, 306 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणाचे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 अंबी  : शेळगाव, ता. परंडा येथील- सोमनाथ कदम व स्वानंद घरत या दोघांनी दि. 04.11.2022 रोजी 18.00 वा. सु. गावातील तांदुळवाडी रस्त्याकडेला मानवी जिवीतास धोका होईल अशा निष्काळजीपने आपापल्या हॉटेलसमोरील शेगडीवर अग्नि प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले. तर वाटेफळ, ता. परंडा येथील- शिवराज मोहिते यांनी याच दिवशी 17.35 वा. सु. गावातील करमाळा रस्त्यावर आपले वाहन रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द अंबी पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web