वाशी फाट्याजवळ कार अडवून सोलापूरच्या दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला 

हमरस्त्यावर दरोड्याच्या घटनेत वाढ, १४ आरोपीना अटक 
 
x

उस्मानाबाद -  उस्मानाबाद - औरंगाबाद महामार्गावरील वाशी फाट्याजवळ सशस्त्र  दरोडेखोरांनी कार अडवून एका दाम्पत्यावर कत्ती , रॉड ,  सळईने जीवघेणा हल्ला केला. यात वर्षा बडे व विशाल बडे हे गंभीर जखमी झाले आहेत, याप्रकरणी पोलिसांनी १४ आरोपीना अटक केली आहे. 

विशाल बडे व वर्षा बडे हे कुटुंब सोलापूर वरून बीडकडे जात असताना वाशी फाट्याजवळ 14 जणांनी त्यांची गाडी अडवत दोघाना ही रॉड व कत्ती ने मारहाण करण्यास सुरुवात केली मारहाण करत त्यांनी या पती पत्नी कडून रोख सहा हजार व 1 लाख वीस हजाराचे सोने देखील हिसकावून घेतले. 

दरम्यान ही घटना घडत असताना रस्त्याने जाणाऱ्या प्रभुलिंग भाळवणे यांनी पोलिसांना फोन करून सोडवण्याचा प्रयत्न केला असता या आरोपींनी त्यांना देखील मारहाण केली आहे .

आरोपीना अटक 

या प्रकरणात 14 आरोपीनापोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे . दिनांक 18 मार्च रोजी  19.30 वा  वर्षा विशाल बडे व त्यांचे पती असे  वाशी फाटा राष्ट्रीयमहामार्गावरुन जात असतांना यातील आरोपी  लहु काळे, किरण पवार, राहुल पवार, अनिल शिंदे , अशोक शिंदे, नवनाथ पवार, कविता शिंदे, सोनारबाई काळे, आशाबाई काळे, उषा काळे, छाया शिंदे , दुर्गा पवार, चतुराबाई पवार, आशाबाई काळे सर्व रा. बारलोणी पारधी पिढी वाशी व इतर यांनी  वर्षा बडे यांचे जवळील रोख रु 6000/- रुपये व तीन तोळयाचे सोन्याचे गंणठण हे  बळजबरीने काढुन घेतले. शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.  अशा मजकुराच्या वर्षा बडे  यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 395, 427, 324, 323, 504, 34अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.  


चोरीचे दोन गुन्हे 

तामलवाडी  : दिनांक 18 मार्च रोजी 10.00 ते 19.00 वा चे दरम्यान काटी येथील रहिवाशी रघुनाथ आगलावे यांच्या बंद घराचे कुलुप तोडुन अज्ञात चोरटयाने  घरात प्रवेश स्टीलच्या टाकीत दाळीमध्ये ठेवलेले  82 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरुन नेले.अशा मजकुराच्या रघुनाथ आगलावे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 454,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.   

वाशी : लाखनगाव येथील सतिष सुभाष मोरे यांची दिनांक 15 मार्च रोजी 06.00 चे पुर्वी कोणीतरी  अज्ञात चोरटयाने एक काळया रंगाची जर्सी गाय ही चोरुन नेली अशा मजकुराच्या सतिष सुभाष मोरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.   

From around the web