नळदुर्ग खंडोबा महायात्रेत चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या सहा जणांना अटक
उस्मानाबाद : मैलारपुर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबाची महायात्रा पाच आणि सहा जानेवारी रोजी पार पडली. या यात्रेस किमान सात लाख भाविक उपस्थित होते. गर्दीचा फायदा घेऊन या यात्रेत भाविकांचे खिसे कापण्याचे आणि महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचं काही प्रकार घडले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सहा जणांना गजाआड करून पकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यात्रेदरम्यान चोरी, जबरी चोरी इत्यादी गुन्ह्यांस आळा घालण्यासाठी व अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी श्री खंडोबा मंदीर परिसरात गस्तीस होते.
यात्रेदरम्यान पथकाने नळदुर्ग पो.ठा. येथे दाखल असलेल्या 1) गुन्हा क्र. 07, 08, 09 /2023 भा.दं.सं. कलम- 379 या चोरीच्या एकुण 3 गुन्ह्यातील चोरीस गेलेली 15,410 ₹ रोख रक्कम हस्तगत करुन 02 आरोपींस अटक केली. 2) भा.दं.सं. कलम- 392 अंतर्गत दाखल गुन्हा क्र. 11, 13 /2023 या जबरी चारीच्या 02 गुन्ह्यांतील सुवर्ण दागिने, रोख रक्कम गुन्हा करण्यास वापरलेले एक चारचाकी वाहन असा एकुण 1,69,500 ₹ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन 04 आरोपींस अटक केली. 3) फौजदारी प्रक्रीया संहिता कलम- 109 अंतर्गत 04 व्यक्तींविरुध्द कारवाई केली.
अशा प्रकारे स्था.गु.शा. च्या पथकाने एकुण 1) सी.आर.पी.सी. कलम- 109 अंतर्गत 04 व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाया केल्या. 2) भा.दं.सं. कलम- 379, 392 या चोरी- जबरी चोरीच्या एकुण 05 गुन्ह्यातील एकुण 1,84,910 ₹ चा माल हस्तगत करुन 06 आरोपींना अटक केली.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा च्या पोनि- यशवंत जाधव, सपोनि- मनोज निलंगेकर, पोलीस अंमलदार- अमोल चव्हाण, शैला टेळे, रंजणा होळकर, बलदेव ठाकुर, रविंद्र आरसेवाड यांच्या पथकाने केली आहे.