शिरढोण :  घरफोडीतील मालासह दोघे आरोपी 24 तासांत अटकेत

 
s

शिराढोण  : दि. 26-27 मार्च दरम्याणच्या रात्री अज्ञात व्यक्तीनी शिराढोण गावातील तीन दुकानांची कुलुपे अज्ञात व्यक्तीनी तोडुन शंभुराजे मेन्स वेअर मधील प्रत्येकी 30 शर्ट व पॅन्ट, अश्विनी मेडिकल मधील 1,000 रकमेसह एक खोके पेय जल तसेच ताजमहल मल्टि सर्विसेस या दुकानातील 1,000 रकमेसह प्रत्येकी 6 हेडफोन, चार्जर व युएसबी केबल असे साहित्य चोरुन नेले होते.  या प्रकरणी शंभुराजे यांच्या  दि. 27 मार्च रोजीच्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 461,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तपासादरम्याण सपोनि,  वैभव नेटके, यांच्या पथकास  गोपनीय माहीती मिळाली कि, या गुन्हयात शिराढोण पारधी पिढी येथील पिंटु माणिक काळे व बबलु नाना काळे या दोघांचा सहभाग असु शकतो. यावरुन पेालीस पथकाने पारधी पिढी, शिराढोण येथे सापळा रचुन नमुद दोघांना काल दि. 28 मार्च रोजी ताब्यात घेतले असता नमुद चोरीतील साहित्य त्यांच्या ताब्यात आढळल्याणे त्यांना अटक करण्यात आली आहे.

चोरीचे दोन गुन्हे दाखल 

शिरोढोण  :  केज , जि.बीड येथील चाँदपाशा पटेल हे दि. 28 मार्च रोजी 12.30 वाजता शिराढोण येथील एका पेट्रोलियम विक्री केंद्रासमोरील रस्त्यावर मुलगा –अलमखॉ व चालक अविनाश नागरगोजे यांच्या समवेत उभे होते. यावेळी शिराढोण ग्रामस्थ-रामा पवार, क्रष्णा जाधव, रणजित परदेशी हे तीघे दोन मोटार सायकलवरुन तेथे येउन नमुद तीघांना शिवीगाळ करुन व काठीने मारहाण करुन चॉदपाशा यांच्या खिशातील 51,000 रुपये रक्कम हिसकावुन घेवुन गेले. अशा मजकुराच्या चाँदपाशा यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 394,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
लोहारा  : जेवळी उत्तर गावातील मोहन घोडके यांची हिरो स्प्लेंडर मोटार सायकल क्र. एमएच 25 एपी 3271 ही  दिनांक 24-25 मार्च दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने घोडके यांच्या घरासमोरुन चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web