शिराढोण  : मोटारसायकल अपघातात एकाच मृत्यू 

 
crime

शिराढोण  : आवडशिरपुर, ता. कळंब येथील- परमेश्वर धर्मराज वाघंब्रे हे गावकरी- सुर्यकांत मधुकर टेणपे यांचे सोबत दि. 20.12.2022 रोजी 09.00 वा. सु. शिराढोण ते आवडशिरपुर रोडणे मोटारसायकल क्र.एम.एच.44 एए 1429 ने प्रवास करत होते. यावेळी सुर्यकांत यांनी नमूद मोटारसायकल ही भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने परमेश्वर हे खाली पडून गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- सुरेखा परमेश्वर वाघंब्रे रा. आवडशिरपुर, ता. कळंब यांनी दि. 21.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद

 उस्मानाबाद :  सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या वाहने थांबवनऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीसांनी  दि. 21.01.2023 रोजी जिल्हाभरात खालीलप्रमाणे 10 कारवाया केल्या.

1) आष्टाकासार, ता. लोहारा येथील- गणेश गवळी,किशोर चौधरी, मारोती  गायकवाड या तिघांनी 16.50 ते 17.10 वा. सु. आपापल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे रिक्षा क्र. एम.एच. 12 सी.टी. 6679, ॲपे रिक्षा क्र. एम.एच. 25 एम 1820 व ॲपे रिक्षा क्र. एम.एच. 25 एम 1621 हे तुगाव येथील बसस्थानका समोर तर जेवळी, ता. लोहारा येथील- विनोद जाधव, गोविंद जाधव, बालाजी गवळी, सागर जाधव, सुनिल दंडगुले या पाच जनांनी  15.40 ते 16.20 वा. सु. आपापल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे रिक्षा क्र. एम.एच. 25 ई 9745, ॲपे रिक्षा क्र. एम.एच. 44 एम 4871, ॲपे रिक्षा क्र. एम.एच. 25 एन 572, ॲपे रिक्षा क्र. एम.एच. 25 ई 9738  व ॲपे रिक्षा क्र. एम.एच. 23 एक्स 2745  हे आष्टामोड जाणारे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना मुरूम पोलीसांना आढळले.

2) कुर्डवाडी, ता. माढा येथील- बाबा शेख यांनी 13.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ओमीनी कार क्र. एम.एच. 12 वाय. ए. 8358 ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील परंडा ते कुर्डवाडी जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना परंडा पोलीसांना आढळले.

3) रामकुंड, ता. वाशी येथील- बाबासाहेब चंदनशिवे  यांनी 18.30 वा. सु. आपल्या ताब्यातील टमटम क्र. एम.एच. 25 एम. 740 ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना वाशी  पोलीसांना आढळले.

            यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 10 गुन्हे नोंदवले आहेत.

 
हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल

तामलवाडी  : सोलापुर येथील- मसा कसबे,मिथुन गायकवाड या दोघांनी दि. 21.01.2023 रोजी 16.10 ते 18.50 वा. सु. आपल्या ताब्यातील रिक्षा  क्रं. एम.एच.13 बीझेड 0461 व रिक्षा  क्रं. एम.एच.13 सी.टी. 1374 हे वाहने एन एच 52 टोलनाका परिसर येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना तामलवाडी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                       

From around the web