शिराढोण : दुहेरी खुनातील दोन वर्षापासुन पसार आरोपी अटकेत

 
crime

शिराढोण : अवैध जमाव जमवुन दोन व्यक्तींचा खुन केल्याबददल  शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 143/2020 हा नोंदवविण्यात आला होता. या गुन्हयातील आरोपी  सुरज दत्ता पवार, रा. जामखेड, जि.अहमदनगर याचा पोलीस गेली दोन वर्ष शोध घेत होते. पोलीस आपल्या मागावर आहेत याची जाणीव आरोपीस असल्याने तो नाव-गाव बदलुन राहत होता. तो पाचेगाव, ता. पाटोदा, जि.बीड येथे राहत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या सपोनि – निलंगेकर, पोहेकॉ- काझी, पठाण, पतंगे यांच्या पथकास मिळताच पथकाने त्यास पाचेगाव येथुन आज दि. 23 मे रोजी अटक केली आहे.

दोन ठिकाणी हाणामारी 

ढोकी : ढोकी येथील सुरेखा दळवी या दि. 22 मे रोजी 9.00 वाजता सुन- अंजली, नातु-वेदांत व शेजारी सुदामती नागिसे यांसह आपल्या घरासमोर होत्या. यावेळी गावकरी- दिपक जाधव यांनी दोन्ही कुटुंबातील जुन्या वैमनस्यातुन सुरेखा यांसह अंजली, वेदांत, सुदामती यांना शिवीगाळ करुन कोयत्याने  मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुरेखा यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उमरगा : काळे भुखंड, उमरगा येथील सिध्दु शिवाजी पवार, वय- 38 वर्ष, यांचा त्यांची पत्नी ज्योती, मुलगा- सुरज, धनराज सुरवसे, शकुंतला जाधव यांनी गळा आवळुन व नाक तोंड दाबुन खुन केला आहे. दि. 22 मे रोजी 00.30 ते 01.30 वा दरम्याण खुन केला आहे. अशा मजकुराच्या शिवराज भाउराव पवार यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web