लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
उस्मानाबाद : एका तरुणाने गावातीलच एका 17 वर्षीय मुलस (नाव- गाव गोपनीय) दि. 18.10.2022 ते 19.10.2022 रोजी दरम्यान लग्नाचे अमिष दाखवून तीचे अपहरन करुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या आईने दि. 19.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 376, 376 (2) (एन) सह पोक्सो कायदा कलम- 4, 6, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मालमत्ते विरुध्द गुन्हे
नळदुर्ग : सिंदगाव, ता. तुळजापूर येथील- महादेव खंडु इंगळे, वय 45 वर्षे यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 18.10.2022 रोजी 08.00 ते 18.00 वा. दरम्यान तोडून घरातील कपाटात असलेले 20 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 1,00,000 ₹ रक्कम असा एकुण 2,00,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या महादेव इंगळे यांनी दि.19.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
रहदारिस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
उस्मानाबाद : तुरोरी, ता. उमरगा येथील- खंडू गोरख होळकर यांनी दि. 19.10.2022 रोजी 13.00 वा. सु. उमरगा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर ॲपे रीक्षा क्र. एम.एच. 25 एन 1056 हा रहदारीस धोकादायकरित्या उभा केला असताना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले. तर शिवाजीनगर तांडा, दाळींब येथील- सचिन धोंडीराम पवार व नळवाडी येथील- शरद शेषेराव कवठे या दोघांनी याच दिवशी 13.30 वा. सु. येणेगुर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर आपापल्या ताब्यातील ॲपे रीक्षा अनुक्रमे एम.एच. 25 एन 326 व एम.एच. 25 एन 863 हे रहदारीस धोकादायकरित्या उभे केले असताना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.
यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.