येरमाळ्यात महिलेवर लैंगिक अत्याचार

 
crime

येरमाळा  : एका गावातील एक 32 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 30.09.2022 रोजी रात्री 23.00 वा. सु. घरी तीच्या मुलांसह झोपलेली असताना गावातीलच एका 22 वर्षीय तरुणाने घरात शिरुन त्याच्या मोबाईल फोनमध्ये असलेला त्या महिलेचा तीच्या पतीसोबत असलेला व्हिडीओ प्रसारीत करण्याची धमकी तीला देउन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि. 03.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376 (2)(एफ), 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 धनगरवाडी येथे हाणामारी 
 
नळदुर्ग  : शेटे तांडा, धनगरवाडी, ता. तुळजापूर येथील- शामराव राठोड, रमेश राठोड, मोहन राठोड, गोविंद राठोड, गुंडू राठोड, अनिल राठोड, महादेव राठोड, वामन राठोड या सर्व लोकांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 02.10.2022 रोजी 09.30 वा. सु. धनगरवाडी शिवारात गावकरी- शंकर व गणेश संतराम निसरगुंडे या दोघा भावांसह शंकर यांचा मुलगा- ओमकार अशा तीघांना शिवीगाळ करुन ठार मारण्याच्या उद्देशाने कोयता, लोखंडी गज, काठीने मारहान करुन नमूद तीघांना गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या ओमकार निसरगुंडे यांनी दि. 03.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मालमत्ते विरुध्द गुन्हे

 तुळजापूर  : उपळे (दुमाला), ता. बार्शी येथील- कुणाल शंकर शिंदे, वय 28 वर्षे हे दि. 01.10.2022 रोजी 16.00 वा. सु. तुळजापूर येथील नवीन बस स्थानकात असताना गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने शिंदे यांच्या विजारीच्या खिशातील अंदाजे 15,000 ₹ किंमतीचा रेडमी मोबाईल फोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या कुणाल शिंदे यांनी दि. 03.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

  रस्ता अपघात 

 तुळजापूर  : अज्ञात चालकाने दि. 01.10.2022 रोजी 19.30 वा. सु. देवसिंगा शिवारातील तुळजापूर ते नळदुर्ग रस्त्यावर टँकर क्र. टी.एन. 28 एजे 3259 हा भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने समोरुन येणाऱ्या टमटम क्र. एम.एच. 45 ए 1883 ला धडकला. या अपघातात टमटम मधील प्रवासी- 1)अनंत गुलचंद घुगे, रा. हगलूर, ता. तुळजापूर 2)रामगोपाल, रा. मध्यप्रदेश हे गंभीर जखमी होउन मतय झाले तर अन्य एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. अशा मजकुराच्या अनंत घुगे (मयत) यांचा मुलगा- राम अनंत घुगे यांनी दि. 03.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web