लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार
उस्मानाबाद : एका तरुणाने गावातीलच एका 22 वर्षीय तरुणीवर (नाव- गावगोपनीय) मागील एक महिन्यापासून जवळीक साधुन तीला लग्नाचे आमिष दाखवून तीला पुणे, अहमदनगर येथे नेउन तीच्याशी वेळोवेळी लैंगीक संबंध प्रस्थापित केले. यानंतर त्या महिलेसह तीच्या कुटूंबीयांनी त्या तरुणासह त्याच्या कुटूंबीयांशी त्या महिलेशी लग्न करण्याची विनवणी केली असता त्या तरुणासह त्याच्या कुटूंबीयांनी त्या महिलेच्या कुटूंबीयांना जातीवाचक शिवीगाळ करुन तीच्यासह कुटूंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि. 08.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 376 (2)(एन), 34 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 (1) (डब्ल्यु) (1)(2), 3 (2)(5), 3 (1) (आर) (एस) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अपहरण
नळदुर्ग : येवती, ता. तुळजापूर येथील- नागनाथ श्रीरंग गवळी, वय 60 वर्षे यांसह त्यांचा मुलगा- रोहीत हे दोघे दि. 04.11.2022 रोजी 18.00 वा. सु. तुळजापूर तालुक्यातील चिवरी गाव शिवारात कानिमीत्त गेले होते. यावेळी मुस्ती, ता. सोलापूर (द.) येथील- अनिल राठोड व चापला तांड, ता. सोलापूर (द.) येथील- रमेश पवार या दोघांनी तेथे जाउन ऊस तोडणी च्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन गवळी पिता- पुत्रांशी वाद घालून त्यांना कार क्र. के.ए. 28 झेड 7854 मधे जबरीने बसवून नेउन त्यांचे अपहरन केले. अशा मजकुराच्या सुरेखा नागनाथ गवळी, रा. येवती यांनी दि. 08.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.