उमरग्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

 
crime

उमरगा  : एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 10.09.2022 रोजी 16.00 वा. सु. तीच्या घरी एकटी असल्याची संधी साधून गावातीलच एका तरुणाने तीच्या घरात घुसून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. यावर त्या मुलीच्या आई- वडीलांनी त्या तरुणास जाब विचारला आसता त्याने त्यांना उर्मटपणे बालून तेथून पसार झाला. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या आईने दि. 11.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376 (2) (जे), 341, 452 सह पोक्सो कायदा कलम- 4, 6, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

रात्रगस्तीदरम्यान एक संशयीत पुरुष ताब्यात

 उस्मानाबाद  : आनंदनगर पोलीस ठाण्याचे पथक दि. 11.09.2022 रोजी रात्री 00.40 वा. सु. उस्मानाबाद शहरात रात्रगस्तीस असताना समतानगर येथे एक पुरुष आपले अस्तीत्व लपवून अंधारात दबा धरुन बसलेला पोलीसांना आढळला. पोलीसांनी त्याची विचारपुस केली असता त्याने आपले नाव- अरबाज मुस्ताफ शेख, रा. सोलापूर असे सांगीतले. अशा अवेळी तेथे उपस्थित असण्याबाबत त्यास विचारले असता त्याने पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलीसांनी त्यास ताब्यात घेउन त्याची अधिक चौकशी करुन आनंदनगर पो.ठा. येथील गुन्हे अभिलेख पडताळला असता त्याच्यावर गुन्हा क्र. 203/2022 हा भा.दं.सं. कलम- 461, 380, 427 अंतर्गत दाखल असल्याचे समजताच त्यास अटक करुन त्याच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 122 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 रस्ता अपघात

 तुळजापूर : विश्वास नगर, तुळजापूर येथील- आनंद धन्यकुमार क्षिरसागर यांनी दि. 03.07.2022 रोजी 10.45 वा. सु. तुळजापूर ते उस्मानाबाद महामार्गावरील बोरी फाटा रस्त्यावर ह्युंदाई व्हेरेना कार निष्काळजीपने, भरधाव वेगात चालवल्याने कारच्या समोरील डाव्या बाजूचे चाक फुटल्याने अपघात झाला. या अपघातात आनंद क्षिरसागर हे स्वत: गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या दिनेश धन्यकुमार क्षिरसागर, रा. विश्वासनगर, तुळजापूर यांनी दि. 11.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web