भूम तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
![crime](https://osmanabadlive.com/static/c1e/client/83983/uploaded/6614302a1f6c0c3cc267d50678c517f6.jpg)
भूम : एका गावातील एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 04.10.2022 रोजी 17.00 वा. सु. आपल्या घरात एकटी असल्याची संधी साधून शेजारील गावच्या एका 25 वर्षीय तरुणाने तीच्या घरात घुसून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास त्याने तीला ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेच्या आईने दि. 22.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 376, 452, 506 सह पोक्सो कायदा कलम- 4, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल
नळदुर्ग : सिंदगाव ता. तुळजापुर येथील- राजेंद्र विठ्ठल बनजगोळे यांच्या बंद घराचे कुलुप अज्ञात व्यक्तीने दि.22.12.2022 रोजी 01.00 ते 06.00 वा. चे सुमारास तोडुन कपाटामधील अंदाजे 1,50,000 ₹ किंमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 50,000 ₹ रोख रक्कम असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या राजेंद्र बनजगोळे यांनी दि. 22.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : कौडगाव ता. उस्मानाबाद येथील- शिवाजी श्रीमंत थोरात, वय 48 वर्षे यांच्या शेतातील पत्रा शेडचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.21.12.2022 रोजी 20.00 ते दि. 22.12.2022 चे 06.00 वा. दरम्यान तोडून आतील अंदाजे 75,000 ₹ किंमतीचे सुमारे 31 कट्टे सोयाबीन व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या शिवाजी थोरात यांनी दि. 22.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.