कळंब तालुक्यात विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार

 
crime

कळंब : एका गावातील एक 24 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 27.12.2022 रोजी 20.00 वा.सु. आपल्या घरात असताना  गावातील एका 22 वर्षीय तरुणाने त्या महिलेस फोन करून गावातील एका गोठयावर बोलवून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास त्याने तिच्यासह तिच्या नवऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतीने दि.28.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-  376,(2)(N), 506 सह अ.जा.ज.कायदा कलम- 3(2)(va) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबादेत फसवणूक 

उस्मानाबाद  :कोठाळवाडी, पिंपरी, पुणे येथील- अनंत त्रिबंक बारखडे पाटील यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड, प्रताप त्रिबंक पाटील रा. रामनगर,उस्मानाबाद यांनी बनवून मे. 2017 ते आज पर्यंत त्या बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड,च्या सहाय्याने न्यायालय,पतसंस्था इत्यादी ठिकाणी त्याचा वापर करून अनंत बारखडे पाटील यांची फसवणूक केली.अशा मजकुराच्या अनंत बारखडे पाटील यांनी दि.28.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 468,465,471 कायदा कलम अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web