अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

 
crime

 उस्मानाबाद  : एक 13 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) मागील तीन महिन्यांपुर्वी आपल्या राहत्या घरात एकटी असल्याची संधी साधून गावातीलच एका 21 वर्षीय तरुणाने तीच्या घरात प्रवेश करुन तीत्यावर लैंगीक अत्याचार केला. यानंतर त्या तरुणाने तीला घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीला व तीच्या कुटूंबीयांना ठार मारण्याची धमकी तीला दिली. अशा मजकुराच्या पिडीत मुलीने दि. 20.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376 (2) (एन), 376 (2) (एफ), 506 सह पोक्सो कायदा कलम- 4, 6, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 तुळजापूर  : भातंब्री, ता. तुळजापूर येथील- धरती तानाजी कांबळे, वय 17 वर्षे हिने दि. 20.11.2022 रोजी 17.30 वा. पुर्वी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. या प्रकरणाच्या चौकशीवरुन तुळजापूर पो.ठा. चे सपोनि- श्री. ज्ञानेश्वर कांबळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबर दिली की, धरतीचे पिता- तानाजी कांबळे हे कौटुंबीक कारणावरुन मागील काही दिवसांपासून धरती हिस टॉर्चर करत होते. त्यांच्या या टॉर्चरला कंटाळून धरती हिने आत्महत्या केली आहे. यावरुन तुळजापूर पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 306 अंतर्गत गुन्हा दि. 20.11.2022 रोजी नोंदवला आहे.

चोरी 
 उस्मानाबाद  : रायखेल, ता. तुळजापूर येथील- गुणवंत कवठेकर व अविनाश तुळजापूरकर यांच्या रायखेल येथील शेत विहिरीवरील व शेत गोठ्यासमोरील एकुण लक्ष्मी कंपनीची 5 अश्वशक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप- 1, फिनोलेक्स कंपनीचे नोजल- 8, पडगीलवार कंपनीचे फवारे- 2, लोखंडी फास- 11, कुऱ्हाड- 1, वाकस- 1 व इतर लोखंडी साहित्य तसेच 40 कि.ग्रॅ. सोयाबीन बियाणे असा एकुण 23,000 ₹ चा माल दि. 19.11.2022 रोजी 20.00 ते दि. 20.11.2022 रोजी 06.30 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या दशरथ भारत मगर, रा. रायखेल, ता. तुळजापूर यांनी दि. 20.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web